Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलीम खान यांची प्रकृती आता कशी आहे? जावेद अख्तर यांनी दिली महत्वाची अपडेट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 09:33 IST

सलीम खान १७ फेब्रुवारीपासून मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मेंदूतील किरकोळ रक्तस्त्रावामुळे (Brain Hemorrhage) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. त्यांचे जुने सहकारी आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल सकारात्मक माहिती दिली आहे.

दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान जावेद अख्तर यांनी सलीम खान यांच्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, "सलीम साहेबांच्या प्रकृतीत आता खूप सुधारणा आहे. ते बरे होत आहेत, आता ते स्वतः खुर्चीवर बसून लोकांशी बोलत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे". 

सलीम खान १७ फेब्रुवारीपासून मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी आमिर खान, शाहरुख खान, संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. आमिर खान म्हणाला, "मी त्यांच्या कुटुंबाला भेटलो. अलविराजींनी मला सांगितले की त्यांची तब्येत रोज सुधारत आहे. आम्ही सर्वजण ते घरी परतण्याची वाट पाहत आहोत". अभिनेत्री डेझी शाह हिनेदेखील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची आणि ते धोक्याबाहेर असल्याची माहिती दिली होती. 

सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगला परतलावडिलांच्या आजारपणामुळे सलमान खानने आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. मात्र, आता वडिलांची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून सलमान पुन्हा एकदा कामावर परतला आहे. तो सध्या 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करत असून, तिथला त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Salim Khan Health Update: Javed Akhtar Shares Positive News

Web Summary : Salim Khan is recovering well after a minor brain hemorrhage and surgery. Javed Akhtar confirmed his health is improving; he's sitting and talking. Celebrities like Aamir Khan visited him. Salman Khan has resumed filming 'Battle of Galwan'.
टॅग्स :जावेद अख्तरसलमान खानसलीम खान