अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा आगामी सिनेमा सध्या यातील एका गाण्यामुळे चर्चेत आहे. होय, या सिनेमात अक्षय व रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पानी’ हे आयकॉनिक सॉन्ग रिक्रिएट केले जाणार आहे. ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा रिक्रिएट केले जाणार म्हटल्यावर खरे तर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण सध्या तरी अक्षयचे चाहते फार खूश नाहीत. या गाण्यावरून अक्षय सध्या ट्रोल होतोय. भरीस भर म्हणजे, गीतकार व लेखक जावेद अख्तरही या गाण्यामुळे संतापले आहेत.
‘टिप टिप बरसा पानी’मुळे संतापले जावेद अख्तर, हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:35 IST
‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावरून अक्षय सध्या ट्रोल होतोय. भरीस भर म्हणजे, गीतकार व लेखक जावेद अख्तरही या गाण्यामुळे संतापले आहेत.
‘टिप टिप बरसा पानी’मुळे संतापले जावेद अख्तर, हे आहे कारण!!
ठळक मुद्दे ‘सूर्यवंशी’त हे गाणे रिक्रिएट केले जाणार असे अक्षयने जाहिर करताच, अनेक लोकांनी सोशल मीडियावर अक्षयला सुनावले.