Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरसाठी ‘या’ व्यक्तीने केल्या सर्व सीमा पार; प्रत्येक फोटोवर लिहिले ‘आय लव्ह यू’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 21:45 IST

मेगा स्टार्सबद्दल लोकांमध्ये प्रचंड आकर्षण असते, हे आपल्याला माहिती आहे. परंतु दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरसाठी एक व्यक्ती ...

मेगा स्टार्सबद्दल लोकांमध्ये प्रचंड आकर्षण असते, हे आपल्याला माहिती आहे. परंतु दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरसाठी एक व्यक्ती असा काही वेडा झाला की, त्यांनी सर्व परिसीमा पार केल्या आहेत. वास्तविक जान्हवीचा अद्यापपर्यंत चित्रपट आला नाही. परंतु अशातही हा व्यक्ती तिच्यासाठी वेडा झाला आहे. त्याने जान्हवीच्या प्रत्येक फोटोवर बºयाचशा गोष्टी लिहिल्या आहेत. वास्तविक सोशल मीडियावर अशी बरेचसे लोक आहेत, जे कलाकारांबद्दल नेहमीच काही ना काही उलटसुलट लिहित असतात. त्याची बरेचशी उदाहरणेदेखील आपल्याला वेळोवेळी बघावयास मिळत असतात. जान्हवीबद्दल देखील असेच काहीसे दिसून येत आहे. जर तुम्ही जान्हवीला सोशल मीडियावर सर्च केले तर तुमच्या लक्षात येईल की एक व्यक्ती असा ज्याने जान्हवीच्या फोटोंचे आपल्या ट्विटर अकाउंटवर कलेक्शन केले आहे. त्याचबरोबर त्याने जान्हवीच्या फोटोबरोबर त्याचाही फोटो न विसरता लावला आहे.  विशेष म्हणजे या व्यक्तीने जान्हवीच्या प्रत्येक फोटोवर ‘आय लव यू जान्हवी’ असे लिहिले आहे. हा सर्व प्रकार बघून हेच म्हणावे लागेल की, हा व्यक्ती जान्हवीसाठी वेडा झाला आहे. त्याचा हा प्रताप आश्चर्य व्यक्त करणारा असून, आता त्याला कोण रोख लावणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, जान्हवी कपूर धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. तिचा हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.