Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरच्या या गोष्टीचे होतंय सोशल मीडियावर कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:37 IST

जान्हवीचे सध्या सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

ठळक मुद्देजान्हवीचा शनिवारी वाढदिवस झाला. ती वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथून परतताना मुंबई विमानतळावर तिच्या फॅन्सने तिला गराडा घातला होता. त्यावेळी तिच्या एका फॅनने तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला.

आपल्या आवडत्या कलाकारासोबत एखादा फोटो काढायला मिळावा असे प्रत्येकाला वाटत असते आणि सध्या तर सेल्फीचा जमाना आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराला भेटून सेल्फी काढण्याची इच्छा अनेकांची असते. पण आपल्या कलाकारांपर्यंत पोहोचण्याआधी फॅन्सना त्यांच्या बॉडी गार्डचा सामना करावा लागतो. अनेकवेळा ते आपल्याला फोटोदेखील काढून देत नाही. असेच नुकतेच काहीसे जान्हवी कपूरच्या फॅनसोबत झाले.

जान्हवी कपूरचा रुही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन ती सध्या करत आहे. जान्हवीचा शनिवारी वाढदिवस झाला. ती वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथून परतताना मुंबई विमानतळावर तिच्या फॅन्सने तिला गराडा घातला होता. त्यावेळी तिच्या एका फॅनने तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या बॉडीगार्डने त्याच्या हातावर फटका मारत त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. हे जान्हवीच्या लक्षात येताच ती त्या फॅनच्या जवळ गेली आणि तिने त्याच्यासोबत सेल्फी काढला. जान्हवीच्या या गोष्टीचे सध्या सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. 

रुही या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ''नदियों पार'' या जुन्या गाण्याला रिक्रीएट करण्यात आले आहे. 2004 साली नदियों पार गाण्याने सा-यांची पसंती मिळवत धुमाकूळ घातला होता. या गाण्याची तीच लोकप्रियता इनकॅश करण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे जान्हवीचे पहिले आयटम साँग असल्यामुळे तिच्या डान्सिंग अदा पाहून चाहतेही फुल ऑन फिदा झाले आहेत. खुद्द जान्हवीनेही तिच्या या लूकचे काही फोटो चाहत्यांसह शेअर केले होते. तिच्या या फोटोंना फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर