बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आई श्रीदेवीबद्दल बोलताना खंत व्यक्त केली. श्रीदेवीच्या निधनाने अभिनेत्रीच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला होता. विवाहित असलेल्या बोनी कपूर यांच्याशी लग्न केल्याने श्रीदेवीला लोक घर तोडणारी म्हणायचे, असं जान्हवीने सांगितलं. "जेव्हा माझी आई जिवंत होती, तेव्हा लोकांना तिच्याप्रती दयाळू भावना नव्हती. तिला घर तोडणारी म्हणून लोक हिणवायचे. याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला होता. तिला वाईटही वाटायचं. पण, सोडून गेलेल्या व्यक्तींवर आपण दया दाखवतो", असं जान्हवी म्हणाली.
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये जान्हवीने हजेरी लावली होती. श्रीदेवीबद्दल बोलताना ती भावुकही झाली होती. ती म्हणाली, "खरं तर आता मी तिला खऱ्या अर्थाने ओळखलं आहे. तिला मी समजू शकले नाही याचं मला दु:ख वाटतं. तिने चार वर्षांची असल्यापासून काम करायला सुरुवात केली होती. पण तिने कधीच तिच्या स्ट्रगल स्टोरी सांगितल्या नाहीत. ती नेहमी आनंद देणाऱ्या गोष्टीच आमच्यासोबत शेअर करायची. आईला गमावणं हा माझ्यासाठी एकप्रकारे धक्का होता. त्यातून मी अजूनही पूर्णपणे बाहेर आलेले नाही".
"मी माझ्या आईवर खूपच निर्भर होते. स्वत:चे निर्णय मी स्वत: घेऊ शकत नव्हते. मी कोणते कपडे घातले पाहिजेत? काय विचार केला पाहिजे? काय बरोबर आहे आणि काय चुकीचं? यासाठी मी आईवर निर्भर होते. जेव्हा आमच्या कुटुंबाबद्दल बोललं जायचं तेव्हा मी माझ्याकडे आईकडे जायचे. आईच्या निधनातून मी अजूनही सावरु शकलेले नाही. तिच्यासारखी कोणीच नाही. जेव्हा माझ्या आईचं निधन झालं तेव्हा मी माझ्या वडिलांनाही गमावलं", असं म्हणत जान्हवीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी १९९६ मध्ये लग्न केलं होतं. बोनी कपूर यांचं हे दुसरं लग्न होतं. त्यांचं पहिलं लग्न शौरी कपूर यांच्यासोबत झालं होतं. १६ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेत श्रीदेवीशी दुसरं लग्न केलं होतं. शौरी कपूर यांच्यापासून त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुले आहेत. तर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या जान्हवी आणि खूशी कपूर या दोन्ही मुली बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
Web Summary : Janhvi Kapoor shared her grief about Sridevi's death and how people treated her unfairly, calling her a home-breaker for marrying Boney Kapoor. Janhvi also spoke about her dependence on her mother and the void Sridevi's death left in her life.
Web Summary : जान्हवी कपूर ने श्रीदेवी की मौत पर दुख व्यक्त किया और बताया कि कैसे बोनी कपूर से शादी करने पर लोग उन्हें घर तोड़ने वाली कहते थे। जान्हवी ने अपनी माँ पर अपनी निर्भरता और श्रीदेवी की मौत से उनके जीवन में आई कमी के बारे में भी बात की।