Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरच्या पिवशीसारख्या दिसणाऱ्या कॉर्नफ्लेक्‍सच्या बॅगची किंमत माहितीय का?, आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:02 IST

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) तिच्या करिअरला नुकतीच सुरूवात केली असली आणि मोजकेच सिनेमे केले असले तरी तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या स्टारसारखी आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) तिच्या करिअरला नुकतीच सुरूवात केली असली आणि मोजकेच सिनेमे केले असले तरी तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या स्टारसारखी आहे. तिच्या सौंदर्याने फॅन्सवर मोहिनी घातली आहे. फॅन्स तिला खूप पसंत करतात. सध्या जान्हवी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी कपूरने लावलेली साईड बॅग. पिशवी सारखी दिसणाऱ्या जान्हवीच्या साईड बॅग सध्या चर्चेत आहे ती का हे जाणून घेऊया. 

जान्हवी कपूरकडे हँडबॅग्जचे चांगले कलेक्शन आहे. तिच्याकडे 'लुई व्हिटन', 'गोयार्ड सेंट लुईस' 'मोशिनो स्पंजबॉब' चॅनेल' ब्रँड्ससह अनेक ब्राँड ब्रँड्सच्या पर्स आहेत. अलीकडे, पापाराझींनी तिला कॉर्नफ्लेक्स डिझाइन असलेल्या बॅगेसोबत स्पॉट झाली.  पिशवीसारखी दिसणारी ही बॅग कॉर्नफ्लेक्ससह फुकट मिळाल्यासारखं वाटतं, पण त्याची रक्कम कळल्यावर तुम्हाला धक्का बसेल.

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी आपल्या कारमध्ये बसताना दिसतेय.  यावेळी जान्हवीच्या कडेला एक बॅग अडकवलेली दिसत आहे. जान्हवीची बॅग अन्या ब्रँड्स कॉर्नफ्लेक्सची आहे, ज्यावर अन्या हिंदमार्क असे लेबल आहे, ज्याची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूड