Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरने पंजाबमध्ये सुरु केलं 'गुड लक जेरी'चं शूटिंग, शेअर केला फर्स्ट लूक

By गीतांजली | Updated: January 11, 2021 19:00 IST

‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी जान्हवी आज एक स्टार आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर हिची आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी जान्हवी आज एक स्टार आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला तिचा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हिट ठरला होता. आता बातमी आहे की जाह्नवीने, त्याच्या पुढच्या ‘गुड लक जेरी’ सिनेमाचं शूटिंग सुरू केले आहे. जाह्नवीने आज या सिनेमातील फर्स्टलूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ट्रेड  एनालिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाशी संबंधीत एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले, “जाह्नवी कपूर आनंद रायच्या प्रॉडक्शनमध्ये दिसणार आहे. जाह्नवी कपूर 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहेत. सिनेमाचे शूटिंग आजपासून पंजाबमध्ये सुरू झाले आहे. सिनेमाचे पहिले शेड्यूल मार्च 2021 पासून सुरू होईल. सिद्धार्थ सेन गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत.  दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे या सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती रंग यलो प्रोडक्शन, लिका प्रॉडक्शन आणि सनडियल एंटरटेन्मेंट यांनी केली आहे. "

काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन गोव्यात व्हॅकेशन सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. त्यांचे गोव्यातील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

टॅग्स :जान्हवी कपूर