Join us

Janhvi Kapoor ला बघून फोटोग्राफर्स म्हणाले - 'मॅम एक फोटो प्लीज', तिने दिेलेल्या उत्तरामुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 15:43 IST

आता 'मिली' सिनेमाचं शूटींग पूर्ण केल्यावर जान्हवी (Janhvi Kapoor) मित्रांसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसली. पण यावेळी तिने असं काही केलं की, सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करू लागले.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी कपूरला फिरायला किती आवडतं हे आपण नुकतंच पाहिलं. ती सारा अली खानसोबत केदारनाथला गेली होती. त्यानंतर खूशी कपूरसोबत दुबईमध्ये गेली होती. आता 'मिली' सिनेमाचं शूटींग पूर्ण केल्यावर जान्हवी मित्रांसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसली. पण यावेळी तिने असं काही केलं की, सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करू लागले.

जान्हवी कपूर फ्रायडे नाइटला आपल्या मित्रांसोबत आउटिंगला निघाली होती. ब्लॅक कलरचा कटआउट शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी  मित्रांसोबत पार्टी करून तिच्या कारमद्ये बसत होती. तेव्हा तिला तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी पोज देण्यास सांगितलं. पण तिने फोटोग्राफर्सना असं काही उत्तर दिलं की,  सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करू लागले. जान्हवी हॉटेलमधून परत जात होती तेव्हा फोटोग्राफर्सने तिला फोटोसाठी विचारलं तेव्हा ती त्यांना ‘सॉरी अब लेट हो रहा है’ असं म्हणाली.

जान्हवीचं उत्तर लोकांना आवडलं नाही. सोशल मीडियावर लोक म्हणत आहे की, जान्हीत अॅटीट्यूड आला आहे. एका यूजरने लिहिलं की, अॅटीट्यूड तर बघा मॅडमचा. दुसऱ्याने लिहिलं की, 'भावांनो तिला फॉलो कशाला करता, आम्हाला अजिबात आवडत नाही'. एकाने लिहिलं की, 'अनेक तासांपासून बाहेर आहे त्याचं काही नाही. एक फोटो क्लिक करण्यासाठी तिला लेट होत आहे'.  

 

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडसोशल मीडिया