Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरसोबत दिसला मिस्ट्री मॅन, सोशल मीडियावर रंगलीय त्याच्याविषयीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 18:04 IST

हे फोटो पाहून जान्हवीसोबत फोटोत दिसणारा मुलगा कोण आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

ठळक मुद्देजान्हवीने या ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण हे फोटो पाहून जान्हवीसोबत असणारा मुलगा कोण आहे असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. हा मुलगा रोहन जौरा असून अनेक फोटोंमध्ये आपल्याला तो दिसत आहे.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने इन्स्टाग्रामवर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. पण हे फोटो पाहून तिच्यासोबत फोटोत दिसणारा मुलगा कोण आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

जान्हवी कपूरचा रुही हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने पहिल्यांदाच डबल रोल साकारला आहे. या चित्रपटात राजकुमार रावसोबत तिची जोडी जमली आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जान्हवी कॉलिफोर्नियामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. मात्र या ट्रीपला ती एकटी गेली नसून दोन खास व्यक्ती तिच्यासोबत मजा करताना दिसतायेत.  

जान्हवीने या ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण हे फोटो पाहून जान्हवीसोबत असणारा मुलगा कोण आहे असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. हा मुलगा रोहन जौरा असून अनेक फोटोंमध्ये आपल्याला तो दिसत आहे.

जान्हवीने शेअर केलेल्या एका फोटोत आपल्याला खुशी कपूरला देखील पाहायला मिळाले होते. पण तिने काहीच तासांत हा फोटो डीलीट केला. 

जान्हवी कपूरने धडक या चित्रपटाद्वारे तिने तिच्या करियरला सुरुवात केली. तिने नुकतेच 'गुड लक जेरी'चे पहिले शेड्युल पूर्ण केले आहे. हा साऊथ स्टार नयनतारा अभिनित तमिळ चित्रपटाचा कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर