Join us
Daily Top 2Weekly Top 5

23 वर्षाच्या जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केले नवे घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 11:19 IST

बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी अनेक स्टार्सनी नवे घर खरेदी केले. आता या यादीत जान्हवी कपूरचे नावही चढले आहे.

ठळक मुद्देजान्हवीने 2018 साली ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या सिनेमात ती झळकली.

बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी अनेक स्टार्सनी नवे घर खरेदी केले. आता या यादीत जान्हवी कपूरचे नावही चढले आहे. होय, 23 वर्षाच्या जान्हवीने मुंबईच्या जुहू भागात कोट्यवधीचे घर खरेदी केले आहे. जान्हवीच्या नावावर आत्तापर्यंत केवळ दोन सिनेमे  आहेत आणि तिने खरेदी केलेल्या घराची किंमत 39 कोटी असल्याचे कळतेय. स्क्वेअर फिट इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी 7 डिसेंबरला जान्हवीने घराची डिल फायनल केली. जुहूमधल्या इमारतीत 3456 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे घर जान्हवीने तब्बल 39 कोटींना विकत घेतले. यासाठी स्टँप ड्युटीपोटी तिने 78 लाख रुपये भरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात 6 कारच्या पार्किंगची जागा आहे.

कोरोना काळात जान्हवीच्या आधी आलिया भट्ट आणि हृतिक रोशननेही मुंबईत नवीन घर विकत घेतले. आलियाने रणबीर कपूर राहत असलेल्या इमारतीत नवा आशियाना खरेदी केला तर  हृतिकने जुहूमधल्या पेंटहाऊससाठी तब्बल 100 कोटी मोजले.

दिवंगत अभिनेत्रीश्रीदेवी व बोनी कपूर यांची लेक जान्हवीने 2018 साली ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या सिनेमात ती झळकली. यावर्षी जान्हवी राजकुमार रावसोबत ‘रूही अफजाना’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय कार्तिक आर्यनसोबत ‘दोस्ताना 2’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. याशिवाय करण जोहरचा मल्टीस्टारर ‘तख्त’ हा सिनेमाही तिने साईन केला आहे. 

मनीष मल्होत्राने या खास लोकांसाठी ठेवली खास डिनर पार्टी, पाहा Inside Photos

श्रीदेवीची मुलगी खूशी कपूरने इन्स्टा अकाउंट केलं पब्लिक, एकापेक्षा एक फोटो झालेत व्हायरल...

टॅग्स :जान्हवी कपूर