मनीष मल्होत्राने या खास लोकांसाठी ठेवली खास डिनर पार्टी, पाहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 02:00 PM2020-12-31T14:00:19+5:302020-12-31T14:07:47+5:30

पार्टी तो बनती है...

नव्या वर्षाचे सेलिब्रेशन सुरु झालेय. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या सेलिब्रेशनसाठीवेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. काही सेलिब्रिटी मात्र घरीच राहून न्यू ईयर सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आहेत.

बॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याने न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडसाठी खास डिनर पार्टी आयोजित केली. त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मनीषच्या या पार्टीत कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर, खूशी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सॅनन, वाणी कपूर आणि नुसरत भारूचा असे सगळेजण पोहोचले.

मनीषने या पार्टीचे काही इनसाईड फोटो त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.

जॅकसोबतचा एक सेल्फी मनीषने शेअर केला.

जान्हवी व खूशी कपूर यांच्यासोबतही त्याने पोज दिली.

क्रिती सॅननसोबतचा हा फोटोही त्याने शेअर केला.

कार्तिक आर्यन जीन्स, ब्लॅक टीशर्ट व वरून चेक शर्ट घालून या पार्टीला पोहोचली.

क्रिती सॅननने या पार्टीसाइी डीप नेक येलो ड्रेस निवडला. यात ती कमालीची स्टाईलिश दिसत होती.

नुसरत या शॉर्ट ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत होती.

कपूर सिस्टर्सचा थाटही बघण्यासारखा होता.