दरम्यान, विकासची पत्नी दिव्या सचदेवा ही सुरुवातीपासून माझे पती निर्दोष असल्याचे म्हणत आहे. त्याचबरोबर तिने जायरासमोर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. जर जायरासोबत छेडछाड होत होती, तर तिने त्याचवेळी फ्लाइटमध्ये किंवा विमानतळावर तक्रार का केली नाही? जायराला इन्स्टाग्रामवर येण्यासाठी दोन तास का लागले? केवळ पब्लिसिटी स्टंटकरिता माझ्या पतीला बळीचा बकरा बनविण्यात आल्याचेही दिव्याने म्हटले. दिव्याने पतीच्या समर्थनार्थ म्हटले की, ‘माझ्या पतीने तिची छेडछाड केली नाही. आमच्या परिवारातील एक तरुण सदस्याचे निधन झाले, ज्याकरिता ते गेले होते. माझे पती गेल्या २४ तासांपासून झोपले नव्हते. त्यांनी क्रूला सांगितले होते की, मला कोणीही त्रास देऊ नये, कारण मला झोपायचे आहे. त्यांनी झोपताना पाय वर केले होते. त्यामुळेच त्यांचा पाय जायराला लागला होता.
दरम्यान, जायरा वसीमने दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये माझ्याशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. यावेळी जायराने रडतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. जायराचा हा व्हिडीओ बघून विकास सचदेवाला पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर त्याच्यावर छेडछाडअंतर्गत पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. परंतु जायराचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर तर तिच्या या प्रतापाचा सर्वत्र समाचार घेतला जात आहे.