Join us

जॅकलिन करतीये वरुणला ढिशुम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 11:34 IST

            जॅकलिन फर्नांडिस वरुण धवनला डिशुम करतीये. आता जॅकलिन असे का करतीये, वरुणला मारण्याची ...

            जॅकलिन फर्नांडिस वरुण धवनला डिशुम करतीये. आता जॅकलिन असे का करतीये, वरुणला मारण्याची हिंमत जॅकलिनने कशी केली असा प्रश्न तर वरुणच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. वरुणने आता असे काय केले जॅकलिनला कि ती त्याला ढिशुम करतीये ही गोष्ट तर त्या दोघांनाच माहित. वरुणने नूकताच सोशल साईटवर एक फोटो अपलोड केला असुन त्यामध्ये जॅकलीन त्याला मागुन खोडकर रितीने मारत असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये जॅकलिन एकदम नॉटि स्माईल देत असुन वरुण दोन्ही हात वर करुन पोझ देत आहे. तर वरुणच्या जॅकेटवर मागे ढिशुम असे देखील लिहिले आहे. म्हणजेच या दोघांचा ढिशुम हा चित्रपट लवकरच आपल्याला पहायला मिळणार आहे.