Jacqueline Fernandez Kashi Vishwanath Temple : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस रविवारी महादेवाची नगरी असलेल्या वाराणसीत पोहोचली. कडक सुरक्षेत तिने बाबा काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले. सुरुवातीला चेहऱ्यावर मास्क लावून एक सामान्य भक्त म्हणून तिनं मंदिरात प्रवेश केला. पण, ती जॅकलिन असल्याचं कळताच तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी उसळली.
श्रीलंकन वंशाची जॅकलिन फर्नांडिसने मंदिराच्या गर्भगृहात मुख्य पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पूजा आणि अभिषेक केला. केवळ दर्शनच नाही, तर तिने मंदिर परिसरात बराच वेळ बसून ध्यानधारणाही केली. तिने कपाळावर त्रिपुंड लावला होता आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली होती. चाहत्यांना पाहून तिने "हर हर महादेव" असा जयघोषही केला.
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना जॅकलिनने आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, "मी काशीबद्दल जेवढं ऐकलं होतं, हे शहर त्यापेक्षाही कित्येक पटीने सुंदर आणि दिव्य आहे. येथील आध्यात्मिक ऊर्जेमुळे मला आंतरिक शांती मिळाली". तिने काशीच्या प्रसिद्ध घाटांचे आणि तेथील वातावरणाचे भरभरून कौतुक केले.
Web Summary : Jacqueline Fernandez visited Varanasi's Kashi Vishwanath temple, offered prayers, and meditated. She praised the city's spiritual energy and beauty, chanting "Har Har Mahadev" to fans after seeking blessings.
Web Summary : जैqueline फर्नांडिस ने वाराणसी के काशी विश्वनाथ मंदिर का दौरा किया, प्रार्थना की और ध्यान लगाया। उन्होंने शहर की आध्यात्मिक ऊर्जा और सुंदरता की प्रशंसा की, और आशीर्वाद लेने के बाद प्रशंसकों के लिए 'हर हर महादेव' का जाप किया।