Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन फर्नांडिसने फोटो शेअर करताना केली ही मोठी चूक, नेटिझन्सच्या आली लक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:51 IST

जॅकलिनने नुकताच शेअर केलेला एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देजॅकलिनने शेअर केलेल्या या फोटोत तिने जे कपडे घातले आहेत, ते थोडेसे फाटलेले आहेत. जॅकलिनने हा फोटो शेअर केला, त्यावेळी तिच्या हे बहुधा लक्षात आले नसेल.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह दिसते आणि सतत ती फॅन्ससाठी वेगवेगळे फोटो-व्हिडीओज शेअर करत असते. जॅकलिन बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्याअभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची, फिटनेसची नेहमीच चर्चा रंगते. पण जॅकलिनने नुकताच शेअर केलेला एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

जॅकलिनने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट घेतला आहे. पण आपण हा फोटो व्यवस्थित पाहिला तर या फोटोत एक चूक आहे. जॅकलिनने शेअर केलेल्या या फोटोत तिने जे कपडे घातले आहेत, ते थोडेसे फाटलेले आहेत. जॅकलिनने हा फोटो शेअर केला, त्यावेळी तिच्या हे बहुधा लक्षात आले नसेल. ती या फोटोत खूपच छान दिसत आहे. जॅकलिनच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. पण त्याचसोबत तुझे कपडे फाटलेले आहेत असे तिला कमेंटच्या माध्यमातून तिचे चाहते सांगत आहेत. जॅकलिन फर्नांडिस आगामी भूत पोलीस, बच्चन पांडे आणि किक २ सारख्या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान कोरोना काळत तिचे सलमान खानसोबतचे एक गाणंही रिलीज झाले होते. तसेच ती बरेच दिवस सलमान खानसोबत त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवरच मुक्कामी होती. तेव्हाचेही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.

जॅकलिन ही मुळची श्रीलंकेची आहे. तिने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात २००९ मध्ये ‘अलादीन’ पासून केली होती. यात तिच्या सोबत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘मर्डर 2’ मध्ये इमरान हाशमीसोबत दिसली होती. जॅकलिन आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. मात्र आजही तिचे नागरिकत्व श्रीलंकाचे आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस