Join us

जॅकलिन फर्नांडिसने पुन्हा सुरु केलं शूटिंग, क्रू मेंबर्ससोबत शेअर केला सेल्फी

By गीतांजली | Updated: October 13, 2020 17:39 IST

जॅकलिनने स्वत: ही माहिती इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान सर्व सिनेमाच्या शूटिंग थांबल्या होत्या. आता हळूहळू कलाकारांनी सेटवर शूटिंगला सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेही शूटिंगला सुरुवात केली आहे. जॅकने स्वत: ही माहिती इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. जॅकलिनने एक सेल्फी शेअर केला आहे. यात जॅकलिनसोबत संपूर्ण क्रू दिसतो आहे. फोटोत जॅकलिन शिवाय संपूर्ण क्रू मास्क आणि किटमध्ये दिसतायेत. जॅकलिन आरशासमोर बसली आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ''मी विसरले होते की शूटिंग लाईफ मस्त आहे. परत आल्याचा मला आनंद आहे.'' 

मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी जॅकलिन शूटिंग करणार होती. मात्र सेटवरचे काही क्रू मेंबर्स कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यानंतर शूटिंग अचानक थांबवण्यात आले. आता जॅकलिन पूर्ण सुरक्षेसह परत आली आहे. जॅकलिन सध्या कोणत्याची सिनेमाचे शूटिंग करत नाहीय. ती ब्रँड आणि जाहिरातींसाठी शूट करते आहे. 

कोरोना काळ्यात जॅकलिन बरेच दिवस सलमान खानसोबत त्याच्या फॉर्म हाऊसवर थांबलेली होती. यादरम्यान दोघांनी एक गाणं सुद्धा शूट केले होते. सलमानसुद्धा शूटिंगला सुरुवात केली. सलमानचा बिग बॉस शो टीव्हीवर आला आहे. आता जॅकलिनचे फॅन्स तिच्या रुपेरी पडद्यावर परत येण्याची वाट पाहत असतील. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस