Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राच्या घरात भाड्याने राहते जॅकलिन फर्नांडिस, घराचं भाडं वाचून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:55 IST

प्रियंका चोप्राच्या घरात जॅकलिन फर्नांडिस भाडोत्री म्हणून राहते आहे.

बॉलिवूडच्या कलाकारांच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. मोठे स्वप्न पाहण्यासाठी ते प्रेरीत करतात. फार कमी वेळेला पाहायला मिळते की एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचे घर रेंटवर घेऊन राहतात. असेच काहीसे जॅकलिन फर्नांडिसने केले आहे.

काही महिन्यापूर्वी जॅकलिनने प्रियंका चोप्राचा मुंबईतील अपार्टमेंट रेंटवर घेतले होते. प्रियंकाने होकार दिल्यानंतर तिच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहण्याची संधी मिळाली आहे. मात्र या घरासाठी ती चांगलेच भाडे मोजते आहे. एका न्यूज रिपोर्टनुसार, जॅकलिन दर महिन्याला ६.७८ लाख रुपये भाडे देते आहे. या अपार्टमेंटचे प्राइम लोकेशन आणि सुविधेमुळे जॅकलिनला इतके भाडे द्यावे लागत आहे.

जॅकलिनने आता फक्त तीन वर्षांसाठी प्रियंकाकडून हे अपार्टमेंट रेंटवर घेतले आहे. तीन वर्षांसाठी जवळपास जॅकलिन २ कोटी ४४ लाख ८ हजार रुपये भाडे देणार आहे. ती तीन वर्षानंतर प्रियंकाच्या या अपार्टमेंटमध्ये राहते आहे की शिफ्ट करते आहे, ते कळू शकलेले नाही. 

सध्या जॅकलिन फर्नांडिस आगामी चित्रपटांच्या शूटिंगमुळे खूप बिझी आहे. सैफ अली खानसोबत भूत पुलिसमध्ये ती झळकणार आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट सर्कसचे ती शूटिंग करते आहे. ती दोन्ही शूटिंगमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करते आहे. ती सर्कस, भूत पुलिस शिवाय अक्षय कुमारसोबत बच्चन पांडेमध्ये दिसणार आहे.

 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसप्रियंका चोप्रा