Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस १३च्या या कंटेस्टंटसाठी राजकुमारीसारखी सजली जॅकलिन फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 06:00 IST

जॅकलिन फर्नांडिसचा राजकुमारी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लवकरच आसिम रियाजसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे. हे होळीवरील स्पेशल साँग आहे. या गाण्याचे बोल आहेत मेरे अंगने में. हे गाणं अमिताभ बच्चन यांचा चित्रपट लावारिसमधील मेरे अंगने में गाण्याचे रिमिक्स आहे. 

जॅकलिन फर्नांडिसआसिम रियाज यांचा हा म्युझिक व्हिडिओ ७ मार्चला रिलीज होणार आहे. नुकतेच या गाण्याच्या सेटवरील फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये जॅकलिन गोल्डन आणि निळ्या रंगाच्या ब्लाऊजसोबत पिंक रंगाच्या साडीत पहायला मिळते आहे. जॅकलिन या साडीत राजकुमारीसारखी दिसते आहे.

जॅकलिनने कमीत कमी मेकअप, मोतींच्या माळा, मांग टीक्का आणि कंबरबंध सोबत लूक पूर्ण केला आहे, हेअरस्टाईलचं सांगायचं तर तिने केस मोकळे ठेवले आहेत. जॅकलिनने सेटवर स्टायविश पोझ दिले आहेत.

जॅकलिनचे समोर आलेल्या फोटोंमध्ये तिच्यासोबत मुली दिसत आहेत. जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर जॅकलिन कार्तिक आर्यनसोबत कन्नड चित्रपट किरिक पार्टीमध्ये पहायला मिळणार आहे. तसेच ती सलमान खानसोबत किक २मध्येही दिसणार आहे. याशिवाय ती जॉन अब्राहमसोबत अटॅक चित्रपटात दिसणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसआसिम रियाजबिग बॉस