Join us

"अजूनही माझ्या डोक्यात अडकून राहिलीये...", अक्षय कुमारसोबत एंगेजमेंट तुटण्यावर रवीना टंडनने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:48 IST

Raveena Tandon And Akshay Kumar : रवीना टंडन आणि अक्षय कुमार हे ९० च्या दशकातील सर्वात चर्चेत असलेले कपल होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण नंतर त्यांचा साखरपुडा तुटला. आज भलेही दोघे आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत, तरीही सोशल मीडियावर आजही त्यांच्या एंगेजमेंटची चर्चा होते. आता रवीनाने याबद्दल भाष्य केलं आहे.

रवीना टंडन आणि अक्षय कुमार हे ९० च्या दशकातील सर्वात चर्चेत असलेले कपल होते. त्यावेळी सोशल मीडिया नसतानाही त्यांच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. जिथे सेलिब्रिटी आपले नाते लाइमलाइटपासून दूर ठेवत होते, तिथे रवीना आणि अक्षयचं नातं कुणापासूनही लपलं नव्हतं. इतकंच नाही, तर रवीना टंडन आणि अक्षय कुमार लग्नही करणार होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण नंतर त्यांचा साखरपुडा तुटला. आज भलेही दोघे आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत, तरीही सोशल मीडियावर आजही त्यांच्या एंगेजमेंटची चर्चा होते. आता रवीनाने याबद्दल भाष्य केलं आहे.

काही काळापूर्वी ANIला दिलेल्या एका मुलाखतीत, रवीना टंडनला विचारण्यात आले की, तिच्या एंगेजमेंटला दोन दशकांहून अधिक काळ झाला आहे, तरीही लोक आजही तिच्या आणि अक्षयच्या साखरपुड्याबद्दल सर्च करतात. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मी तर ते विसरूनही गेले आहे." 

''एक साखरपुडा जो तुटला होता, तो...'' 

ती पुढे म्हणाली, "हो, मला वाटतं की 'मोहरा' चित्रपटाच्या वेळी आम्ही हिट जोडी होतो आणि आजही आम्ही सामाजिकरित्या भेटतो, तेव्हा गप्पा मारतो. कृपया, सगळे जण पुढे जातात. कॉलेजमध्ये मुली प्रत्येक आठवड्याला त्यांचे बॉयफ्रेंड बदलत आहेत, तेव्हापासून आतापर्यंत. पण एक साखरपुडा जो तुटला होता, तो अजूनही माझ्या डोक्यात अडकून राहिलाय. मला माहीत नाही का? लोकांचे घटस्फोट होतात, ते आयुष्यात पुढे जातात. मग यात इतकी मोठी गोष्ट काय आहे?"

रवीनासारख्या दिसणाऱ्या मुलींना अक्षय डेट करायचा?याच मुलाखतीत जेव्हा रवीना टंडनला त्या रिपोर्ट्सबद्दल विचारण्यात आलं, ज्यात असा दावा केला गेला होता की अक्षय फक्त तिच्यासारख्या दिसणाऱ्या मुलींनाच डेट करायचा. याबद्दल अभिनेत्री म्हणाली, "मी त्याबद्दल लिहिलेली कोणतीही गोष्ट वाचत नाही, कारण उगाच कशाला मी माझा रक्तदाब वाढवून घेऊ? म्हणून न वाचणेच चांगले."

English
हिंदी सारांश
Web Title : Raveena Tandon breaks silence on broken engagement with Akshay Kumar.

Web Summary : Raveena Tandon addressed her past engagement with Akshay Kumar, stating she's moved on. She dismissed ongoing public fascination, questioning why it remains a topic of discussion. She ignores reports about Akshay dating similar-looking women.
टॅग्स :अक्षय कुमाररवीना टंडन