Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इश्क हुआ...", अजय देवगणची काजोलसाठी रोमँटिक पोस्ट, शेवटच्या फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:18 IST

Ajay Devgn And Kajol : अजय देवगण आणि काजोल बॉलिवूडमधील क्युट कपल्सपैकी एक आहे. दोघांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे 'इश्क'. या सिनेमाला आज २८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

अजय देवगण आणि काजोल बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे. दोघे एकत्र खूप मस्ती करताना दिसतात. या कपलची लव्हस्टोरी खूप खास आहे. चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली होती. दोघांनी आज एकमेकांसाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. काजोल आणि अजय देवगणने एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. त्यांचा सर्वात खास सिनेमा 'इश्क' आहे. या चित्रपटाला आज २८ वर्षे पूर्ण झाले आहेत.

इश्क सिनेमात अजय देवगण, काजोल, आमिर खान आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील अजय आणि काजोलची केमिस्ट्री खूप भावली होती आणि खऱ्या आयुष्यात त्यांची केमिस्ट्रीही खूप छान आहे. चित्रपटाला २८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजयने काजोलसाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. यातील शेवटचा फोटो पाहून तुम्ही म्हणाल अजय किती क्यूट आहे.

अजय झाला रोमँटिकअजय देवगणने सिनेमातील काजोलसोबतचा फोटो शेअर केला, ज्यात दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले - 'इश्क हुआ'. दुसरा फोटो त्यांच्या लग्नातला आहे. त्या फोटोखाली 'कैसे हुआ' हे कॅप्शन लिहिले आहे आणि तिसऱ्या फोटोत त्याने त्याच्या फॅमिलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अच्छा हुआ'. अजयने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, ''जैसे हुआ, अच्छा ही हुआ है. २८ वर्षे 'इश्क'चे.''

चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षावअजय देवगणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले की, तुमच्या लग्नाला खूप वर्षे झाले माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्याने लिहिले- सर्वात क्युट कपल. 

अजय देवगण आणि काजोलने २४ फेब्रुवारी, १९९९ साली लग्न केले. त्यांनी गुपचूप लग्न केले होते. त्या दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी निसाची बॉलिवूडमधील पदार्पणाची चाहते वाट पाहत आहेत. पण इतक्यात तिचा इंडस्ट्रीत पदार्पण करण्याचा विचार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajay Devgn's romantic post for Kajol celebrates 'Ishq' anniversary.

Web Summary : Ajay Devgn shared a romantic post for Kajol, celebrating 28 years of their film 'Ishq'. The post features photos from the movie, their wedding, and their family, delighting fans with their enduring love.
टॅग्स :काजोलअजय देवगण