बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच 'दे दे प्यार दे २' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. तिने सांगितले की, ती प्रेग्नंट असतानाच या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. हा काळ तिच्यासाठी आव्हानात्मक होता, पण तिने हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. इशिताने हेही सांगितले की, शूटिंगच्या वेळी तिने आपल्या गरोदरपणाची बातमी गुप्त ठेवली, जेणेकरून कामावर कोणताही परिणाम होऊ नये. दोन मुलांची मुलगा वायू आणि मुलगी वेदा यांची आई बनल्यानंतर रिलीज होणारा हा तिचा पहिला चित्रपट आहे.
इशिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज सेक्शनमध्ये 'दे दे प्यार दे २' च्या पोस्टरशेजारी स्वतःचा एक फोटो शेअर केला. यात तिने सांगितले की, इतक्या मोठ्या काळानंतर पडद्यावर परतणे हे 'नवीन सुरुवात' असल्यासारखे वाटत आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले, "या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे... दोन्ही मुलांनंतरचा माझा हा पहिला चित्रपट आहे. याचे शूटिंग करत असताना मी प्रेग्नंट होते. ४ वर्षांनंतर परत येणे खूपच विचित्र वाटत आहे, जणू काही एक नवीन सुरुवात! तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. मी हे सांगू शकते का की मी पोज देणे विसरले आहे, एका नवीन सुरुवातीसाठी उत्सुक आहे."
'दे दे प्यार दे २'च्या ट्रेलरला मिळतेय पसंतीनुकताच 'दे दे प्यार दे २' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये आयशा नावाच्या मुलीची कथा आहे, जी तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या एका व्यक्तीवर प्रेम करते. या चित्रपटात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच आर. माधवन हे रकुल प्रीत सिंहच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. सुरुवातीला ते या नात्याने आनंदी असतात, पण नंतर हळूहळू त्यांचे खरे रूप समोर येते.
१४ नोव्हेंबरला चित्रपट रिलीज'दे दे प्यार दे २'चे दिग्दर्शन अंशुल शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाची कथा लव्ह रंजन यांच्यासोबत तरुण जैन यांनी लिहिली आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग हे याचे निर्माते आहेत. 'दे दे प्यार दे २' हा चित्रपट १४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Ishita Dutta filmed 'De De Pyaar De 2' while pregnant, keeping it secret. It's her first film after having two children, releasing November 14. She expresses excitement about her return to the screen after four years.
Web Summary : इशिता दत्ता ने गर्भवती होने के दौरान 'दे दे प्यार दे 2' की शूटिंग की, जिसे गुप्त रखा। दो बच्चों के बाद यह उनकी पहली फिल्म है, जो 14 नवंबर को रिलीज हो रही है। उन्होंने चार साल बाद स्क्रीन पर वापसी को लेकर उत्साह जताया।