ईशाने तिचा एका लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यामध्ये ती पती भरत तख्तानी याच्यासोबत बघावयास मिळत आहे. या फोटोमध्ये ईशाने प्रेग्नेंसीदरम्यान वाढलेल्या वजनाचा एक फोटो अन् आताचा फोटो एकत्र क्लब करून शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ईशाने लिहिले की, ‘हळूहळू का होईना, परंतु मी पहिल्यासारखा फिगर मिळविण्यात यशस्वी ठरत आहे.’
यावेळी ईशाने आई बनलेल्या महिलांना एक टीप्स देताना कमीत कमी अर्धा तास फिजिकल अॅक्टिव्हिटी करण्याचा सल्ला दिला आहे. काही काळापूर्वी ईशाने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती आपल्या मित्रांसोबत बघावयास मिळत होती. तिचा हा फोटो प्रेग्नेंसीनंतर जीममध्ये पहिल्याच दिवशीचा होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, मला लवकरात लवकर वजन कमी करायचे आहे.
दरम्यान, ईशाने आता शेअर केलेल्या फोटोंवरून स्पष्ट होते की, तिची मेहनत काहीशी सार्थकी ठरत आहे. कारण झटपट रिझल्ट दिसत असल्याने ईशा पुन्हा एकदा पहिल्यासारखा फिगर मिळविताना दिसत आहे. ईशाप्रमाणेच अभिनेत्री करिना कपूर-खान, शिल्पा शेट्टी, करिष्मा कपूर, मलाइका अरोरा, ऐश्वर्या राय, सोहा अली खान या अभिनेत्रींनाही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.