Join us

मिस्ट्री मॅननंतर आता EaseMyTripच्या फाउंडरसोबत कंगनाचे फोटो व्हायरल, पुन्हा रंगल्या डेटिंगच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 13:18 IST

कंगना रणौत EaseMyTrip च्या फाउंडरला करतेय डेट? अयोध्येतील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. कंगना कधी तिच्या वक्तव्यांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच कंगनाचा मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हा कंगनाच्या डेटिंगच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. तेव्हा कंगनाने याबाबत पोस्ट शेअर करत मिस्ट्री मॅनचा उलगडा करत तो हेअरस्टायलिश असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा कंगनाच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. कंगनाचे EaseMyTrip च्या फाउंडरसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी कंगनाने हजेरी लावली होती. यावेळी तिला EaseMyTrip चे फाऊंडर निशांत पिट्टी यांच्याबरोबर स्पॉट करण्यात आलं. कंगना आणि निशांत पिट्टी फोटोसाठी एकमेकांसोबत पोझ देताना दिसून आले. अयोध्येतील कंगना आणि निशांत पिट्टी यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कंगनाच्या या फोटोंमुळे पुन्हा तिच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. 

निशांत पिट्टी हे EaseMyTripचे सीईओ आहेत. मालदीवबरोबर झालेल्या वादामुळे ते चर्चेत आले होते. मालदीव वादानंतर त्यांनी EaseMyTrip वरील मालदीवच्या सगळ्या बुकींग रद्द केल्या होत्या. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर कंगनाने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. १४ जूनला कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कंगनाने केलं असून आणीबाणीच्या काळावर यातून भाष्य करण्यात आलं आहे. 'इमर्जन्सी'मध्ये कंगनाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटी