Join us
Daily Top 2Weekly Top 5

नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:26 IST

एका फोटोमुळे हार्दिक आणि माहिकाने साखरपुडा केला की काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. 

क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या पर्सनल लाइफमुळे कायमच चर्चेत असतो. नताशा स्टँकोविचला घटस्फोट दिल्यानंतर आता हार्दिक मॉडेल माहिका शर्माला डेट करत आहे. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. याशिवाय माहिकासोबतचे फोटोही हार्दिक शेअर करत असतो. अशाच एका फोटोमुळे हार्दिक आणि माहिकाने साखरपुडा केला की काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. 

हार्दिकने सोशल मीडियावरुन काही फोटो शेअर केले होते. यामध्ये त्याचे क्रिकेट खेळतानाचे मुलगा अगस्त्यसोबत माहिकाबरोबरचेही काही फोटो होते. या पोस्टमध्ये हार्दिक आणि माहिकाचा एक व्हिडीओही होता. ज्यामध्ये तो माहिकासोबत पूजा करताना दिसत आहे. माहिकासोबत हार्दिकचा आणखी एक फोटो आहे. ज्यामध्ये माहिकाच्या बोटात अंगठी दिसत आहे. त्या फोटोंमुळे हार्दिकने माहिकासोबत साखरपुडा केला का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण, याबाबत अद्याप माहिका किंवा हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

कोण आहे माहिका शर्मा? 

माहिका एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते. 'इन टू डस्क', 'पीएम नरेंद्र मोदी' यांसारख्या सिनेमांमध्ये ती छोट्या भूमिकेत दिसली होती. माहिका २४ वर्षांची असून हार्दिकसोबतच्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. 

हार्दिकने याआधी नशातासोबत लग्न केलं होतं. २०२० मध्ये त्यांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र २०२४ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अगस्त्य हा मुलगादेखील आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्यासेलिब्रिटी