Join us
Daily Top 2Weekly Top 5

६०व्या वर्षी आमिर खानने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा? गौरीच्या बोटातील अंगठीमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:55 IST

गौरीच्या बोटातील अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अंगठ्यांमुळे त्यांच्या आमिर आणि गौरीने साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कायमच त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. त्याचं लव्ह लाइफ हा चर्चेचा विषय आहे. दोन लग्न मोडल्यानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅट हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक कार्यक्रमांमध्येही आमिर आणि गौरी एकत्र दिसतात. अशाच एका कार्यक्रमातील त्यांच्या फोटो आणि व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे. आमिर आणि गौरी दोघांच्याही हातात अंगठ्या दिसत आहेत. गौरीच्या बोटातील अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अंगठ्यांमुळे त्यांच्या आमिर आणि गौरीने साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच आमिरने गौरीसह एका बिजनेसमॅनच्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आमिर आणि गौरीने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. त्यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गौरीच्या बोटात रत्नजडित अंगठी दिसत आहे. ती अंगठी पाहून आमिरने गौरीसोबत साखरपुड्या केल्या असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

नेमकं सत्य काय? 

खरं तर आमिरने त्याचा लग्नाचा कोणताही प्लॅन नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. मनात गौरीसोबत आधीच लग्न केल्याचंही तो म्हणाला होता. त्यामुळे त्याने गौरीसोबत साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी तसं काहीही झालेलं नाही. आमिर खाननेच गौरीसाठी दोन अत्यंत खास अशा हिरेजडित अंगठ्या बनवून घेतल्या होत्या. एका लक्झरी दागिन्यांच्या ब्रँडच्या या अंगठ्या आहेत. गौरीच्या बोटात दिसणारी अंगठीही यापैकीच एक आहे. त्यामुळे त्यांनी साखरपुडा केलेला नाही हे स्पष्ट झालं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aamir Khan Engaged to Girlfriend at 60? Ring Sparks Rumors

Web Summary : Aamir Khan's relationship with Gauri Spratt sparks engagement rumors after photos surface showing rings. Aamir previously stated he felt married to Gauri and had diamond rings made for her by a luxury brand, clarifying no formal engagement occurred.
टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटी