Join us

‘रॉकस्टार’ होण्यासाठी इरफान करतोय मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 09:34 IST

बॉलिवूड अभिनेता इरफान खान लवकरच रॉकस्टारच्या भूमिकेत पाहयाला मिळणार आहे. होमी अडाजनिया यांच्या आगामी ‘ताकदूम’ या चित्रपटात एक मजेदार ...

बॉलिवूड अभिनेता इरफान खान लवकरच रॉकस्टारच्या भूमिकेत पाहयाला मिळणार आहे. होमी अडाजनिया यांच्या आगामी ‘ताकदूम’ या चित्रपटात एक मजेदार भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे त्याची ही भूमिका एका प्रसिद्ध रॉकस्टारच्या जीवनावर आधारित आहे. या भूमिकेसाठी तो चांगलीच मेहनत घेत आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व परिणीती चोप्रा यांच्याही भूमिका आहेत. इरफान खानने आपल्या चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या भूमिका प्रेक्षकांनी पसंत केल्या आहेत. आता तो आगामी ‘ताकुदूम’ या चित्रपटात रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूत याची ताकदुममध्ये प्रमुख भूमिका असून त्याला संगीतकार व्हायचे आहे. तो एका रॉकस्टारचा चाहता आहे. त्याला त्याच्यासारखे बनायचे आहे. रॉकस्टारच्ी भूमिका इरफान खान साकारणार आहे. त्याची ही भूमिका मिक जॅगर व जॉन लेनॉन या प्रसिद्ध रॉकस्टारच्या आयुष्यापासून प्रेरित आहे. या भूमिकेसाठी तो चांगलीच मेहनत घेत असून मिक व जॉन यांच्या जीवनाबद्दल माहिती गोळा करीत आहे. रॉकस्टारच्या भूमिकेसाठी त्याला आपल्या लुकमध्ये बरेच बदल करावे लागले आहेत. विशेष म्हणजे ‘ताक दुम’मध्ये दिसणारा त्याचा लुक आतापर्यंत एकाही चित्रपटात दिसलेला नाही. यामुळे तो या टास्कसाठी चांगलाच उत्सुक आहे. बॉलिवूडमध्ये आपला वेगळी ओळख तयार केल्यावर इरफानने अनेक हॉलिवूडपटात काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक रॉन हॉवर्ड यांच्या ‘इन्फर्नो’ या चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो टॉम हॅक्स सोबत दिसला होता. रुपेरी पडद्यावर इरफान रॉकस्टारच्या रुपात पाहायला मिळणार आहे ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब असून खुद्द इरफान देखील या भूमिकेसाठी मेहनत करतो आहे.