Join us  

​इरफानचा पुरूषांना सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2016 12:33 PM

इरफान खान चित्रपटात डाऊन टू अर्थ भूमिका साकारतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण खासगी आयुष्यातही इरफान अगदी डाऊन टू ...

इरफान खान चित्रपटात डाऊन टू अर्थ भूमिका साकारतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण खासगी आयुष्यातही इरफान अगदी डाऊन टू अर्थ आहे. वेळ मिळेल तेव्हा तो पत्नीला घरकामांत मदत करतो. प्रत्येक पुरुषाने घरकामांमध्ये पत्नीला मदत केली पाहिजे. यात कसलीही लाज नाही, असा सल्ला त्याने समस्त पुरूष मंडळींना दिला आहे. अलीकडे इरफान पत्नी सुतापा हिच्यासोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचला. यावेळी तो या मुद्यावर अगदी भरभरून बोलला. घरकामांत पत्नीला मदत म्हटले की, पुरूषांना लाज वाटते. लाजेपोटी ते या कामापासून दूर पळतात. पण पत्नीला मदत करणे हे प्रत्येक पुरूषाचे कर्तव्य आहे. आपल्या पार्टनरसाठी नाही तर किमान आपल्या मुलांसाठी तरी पुरूषांनी ही जबाबदारी उचलली पाहिले. मुलांसमोर एक आदर्श उदाहरण यानिमित्ताने तुम्ही घालून देऊ शकतात. स्त्री-पुरूष दोघेही समान आहेत, याचे  हे एक आदर्श उदाहरण ठरेल. मी माझ्या पत्नीला घरकामात मदत करतो. मला यात कुठलीही लाज वाटत नाही. मी सर्व पिता, पती आणि पुरूषांनाही घरकामांची जबाबदारी उचला, असेच सांगेल,असे इरफान यावेळी म्हणाले...वेल डन इरफान...!!