Join us

​ इरफान खान अन् किर्ती कुल्हारीला ‘ब्लॅकमेल’ करतोय हा दिग्दर्शक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 14:26 IST

अभिनेत्री किर्ती कुल्हारी आणि अभिनेता इरफान खान यांना दिग्दर्शक अभिनय देव ‘ब्लॅकमेल’ करतोय... वाचून धक्का बसला ना? पण घाबरू ...

अभिनेत्री किर्ती कुल्हारी आणि अभिनेता इरफान खान यांना दिग्दर्शक अभिनय देव ‘ब्लॅकमेल’ करतोय... वाचून धक्का बसला ना? पण घाबरू नका. तुम्ही समजतायं, असे काहीही नाही. होय, अभिनय देव कुणालाही ‘ब्लॅकमेल’ करत नसून त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘ब्लॅकमेल’ आहे. या चित्रपटात इरफान खान आणि किर्ती कुल्हारी हे दोघे लीड रोलमध्ये  आहेत. टी-सीरिज आणि आरडीपी मोशन पिक्चर्स हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. नावावरून हा चित्रपट गंभीर वाटत असला तरी प्रेक्षकांना यात कॉमेडीचा जबदस्त तडका पाहायला मिळणार आहे. आज इरफान खानने आपल्या सोशल अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली. ३० मार्च २०१८ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. हसून हसून लोटपोट होण्यासाठी सज्ज असा, असे इरफानने म्हटले आहे. अलीकडच्या काळात इरफान खानने आपली इमेज पूर्णपणे बदललीयं. सध्या बॉलिवूडच्या अनेक मुख्य प्रवाहातील चित्रपटांत इरफान दिसतो आहे. इरफानचा ‘लंचबॉक्स’ हा चित्रपट कमालीचा गाजला होता. यानंतर आलेला ‘पीकू’ हा चित्रपटही हिट झाला होता. नुकताच इरफानचा ‘करीब करीब सिंगल’ रिलीज झाला. हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. त्यापूर्वी आलेल्या ‘हिंदी मिडियम’ने तर लोकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. आता इरफान कॉमेडीसह परतणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते निश्चितच उत्सुक असणार.गेल्या २८ वर्षांपासून इरफान इंडस्ट्रीत आहे. १९८८ मध्ये इरफानने आपल्या करिअरची सुरवात केली. पण त्याला खरी ओळख सन २००० मध्ये मिळाली. केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही त्याने आपले झेंडे गाडलेत.ALSO READ : #MeToo: महिलाच नाही तर पुरूषांनीही दिली होती ‘सेक्स’ची आॅफर ; इरफान खानचा धक्कादायक खुलासा!!किर्ती कुल्हारीबद्दल साांगयचे तर अलीकडे तिचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण यातील किर्तीच्या भूमिकेचे बरेच कौतुक झाले होते. त्यापूर्वी ‘पिंक’ आणि ‘जल’ या चित्रपटात ती दिसली होती.