अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकून पडले आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. ईशा गुप्ता, सोनल चौहान युद्ध सुरू झाल्यानंतर दुबईत अडकल्या होत्या. आता त्या सुखरुप भारतात परतल्या आहेत. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सिंगर असलेल्या अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगाही दुबईत अडकला आहे. याबाबत त्यांनी पोस्ट करत सरकारला विनंती केली होती.
अभिजीत भट्टाचार्य यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की "माझा मुलगा जय भट्टाचार्य यावेळी दुबईमध्ये अडकला आहे. एक वडील म्हणून आमच्या कुटुंबासाठी ही खूपच कठीण वेळ आहे. मी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला विनंती करतो की त्यांच्या परिस्थितीकडे लक्ष द्या. आणि त्यांना लवकरात लवकर भारतात येण्यासाठी मदत करा. तुमच्या मदतीची अपेक्षा आहे. माझ्या मुलाला घरी सुरक्षित आणण्यासाठी मदत करा". पण त्यानंतर काही वेळाने अभिजीत भट्टाचार्य यांनी ही पोस्ट डिलीट केली. त्यामागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने युएईमधील अमेरिकेचे सैन्य तळ असलेल्या ठिकाणांवर हल्ले केले होते. या युद्धामुळे हवाई मार्गावर परिणाम झाल्याने हवाई वाहतूक काही काळ बंद होती. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक हे परदेशात अडकून पडले आहेत. आता त्यांना सुखरुप भारतात परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
Web Summary : Singer Abhijeet Bhattacharya's son was stuck in Dubai due to the Iran-Israel conflict. Abhijeet appealed to the Indian government for help, then deleted the post. Many Indians were stranded abroad amid the conflict, with efforts underway to bring them home.
Web Summary : गायक अभिजीत भट्टाचार्य के बेटे ईरान-इजरायल संघर्ष के कारण दुबई में फंस गए थे। अभिजीत ने भारत सरकार से मदद की अपील की, फिर पोस्ट हटा दी। संघर्ष के बीच कई भारतीय विदेश में फंसे हुए हैं, जिन्हें घर लाने के प्रयास जारी हैं।