ंैवास्तविक अनिरुद्ध अग्रवाल याने हीरो बनण्याची इच्छा ठेवून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. मात्र त्याला हीरो न बनता व्हिलन म्हणूनच चित्रपटांमध्ये काम मिळत गेले. स्क्रीनवर दरोडा, हत्या तसेच बलात्काराचे सीन करण्यासाठी अनिरुद्ध निर्मात्यांची फर्स्ट चॉइस बनत गेला. पुढे तो एक भयानक खलनायक म्हणून समोर आला. अनिरुद्ध अग्रवाल याने त्याच्या करिअरमध्ये ‘बंद दरवाजा, पुरानी हवेली आणि पुराना मंदिर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर ‘बॅँडिट क्विन’मध्ये त्याने बाबू गुज्जरची भूमिका साकारली.
खरं तर अनिरुद्ध याची खरी ओळख त्याचे बलदंड शरीर हेच आहे. त्यामुळेच हॉरर चित्रपटांची क्रेझ कमी झाल्यानंतर अनिरुद्ध अग्रवाल याच्या अडचणी सुरू होत गेल्या. त्यामुळे त्याने छोट्या पडद्यावर आपला मोर्चा वळविला. परंतु याठिकाणी देखील फारसे काही करता आले नाही. काही मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारल्यानंतर त्याला काम मिळणे बंद झाले. त्यामुळेच गेल्या सात वर्षांपासून अनिरुद्ध पडद्यावरून गायब आहे. अनिरुद्ध अखेरीस विल्सन लुइसच्या ‘मल्लिका’ (२०१०) मालिकेत बघावयास मिळाला होता. त्यानंतर या महाकाय खलनायकाने फिल्मी दुनियेला बाय-बाय केले. सध्या अनिरुद्ध बिझनेसमॅनची भूमिका पार पाडत आहे. कारण तो अधिकाधिक आपल्या कुटुंबीयांना वेळ देत आहे.