Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुवन बाम, कॅरी मिनाटी यांसारखे प्रसिद्ध युट्युबर आले एकत्र, कोरोना संकटासाठी गोळा करणार 50 लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 15:42 IST

आता भारतातील प्रसिद्ध युट्युबरने येऊन कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एक मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देमास्क ऑन इंडिया चॅरिटी स्ट्रीम द्वारे भारतातील प्रसिद्ध युट्युबर आपल्या फॅन्सना कोरोनाच्या या संकटाला तोंड देण्यासाठी पैसे दान करण्याचे आवाहन करत आहेत

कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर झाला असून अनेक रुग्णांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ऑक्सिजन, लस, इंजेक्शन खरेदीसाठी लोकांना प्रचंड खर्च होत आहे. आता भारतातील प्रसिद्ध युट्युबरने येऊन कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एक मोहीम सुरू केली आहे.

मास्क ऑन इंडिया चॅरिटी स्ट्रीम द्वारे भारतातील प्रसिद्ध युट्युबर आपल्या फॅन्सना कोरोनाच्या या संकटाला तोंड देण्यासाठी पैसे दान करण्याचे आवाहन करत आहेत. तुम्ही चीप्स कमी खा.... पण कोरोनाच्या काळात मदत करा असे ते त्यांना सांगत आहेत. 

Mythpat या युट्बुयब चॅनेलवर 50,00,000 CHARITY STREAM हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यासोबत https://fundraisers.giveindia.org/donate/LC60868870ac7e6#!/amount ही लिंक देण्यात आली आहे. या लींकला क्लिक करून तुम्ही पैसे देऊन या मोहिमेत सहभागी होऊ शकता. या मोहिमेद्वारे आतपर्यंत अनेकांनी पैसे दिले आहेत. 

 

टॅग्स :यु ट्यूबकोरोना वायरस बातम्या