भारतीय वंशाची रॅपर टॉमी जेनेसिस (Tommy Genesis) या म्युझिक व्हिडीओमुळे वादात सापडली आहे. या व्हिडीओमध्ये तिने हिंदू देवी माँ कालीसारखा मेकअप केला आहे आणि सोनेरी बिकिनी घातली आहे. तिच्यावर हिंदू देवी माँ काली यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओचे नाव ट्रू ब्लू आहे. हा व्हिडीओ रिलीज होताच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
व्हिडीओमध्ये असे दिसून आले की, टॉमी जेनेसिसने तिचे शरीर निळ्या रंगाने रंगवले आहे आणि तिने सोन्याचे दागिने घातले आहेत. तिने लाल रंगाची बिंदी लावली आहे. तिने मांग टीका, नथ, हार आणि कानातले घातले आहेत. तिने हातात बांगड्या घातल्या आहेत. यासोबतच तिने सोन्याची बिकिनी घातली आहे. यासोबतच तिने तिच्या प्रायव्हेट पार्टवर क्रॉस मार्कही ठेवला आहे. या व्हिडीओमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे पाहिल्यानंतर युजर्स संतापले आहेत.
रॅपर रफ्तार यांनी केली टीका रॅपर रफ्तार यांनी तिच्या या लूकवर टीका केली आहे. त्यांनी युट्यूबवर व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की, हिला रिपोर्ट करा. हे अस्तित्वात नसले पाहिजे.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्सरफ्तार यांनी याची तक्रार केल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओची तक्रार केली आहे. एका युजर्सने लिहिले की, रफ्तार आणि पँथर भाई दोघेही खरे हिप हॉप कलाकार आहेत जे आपल्या संस्कृतीबद्दल विचार करतात. एका युजर्सने म्हटले की, रफ्तार, याबद्दल आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. रिपोर्ट केले. एकाने लिहिले की, माँ काली ही विश्वाची आई आहे. आम्ही तिची रक्षक म्हणून पूजा करतो. वर्षानुवर्षे, आक्रमणकर्ते, वसाहतवादी आपल्या देवींचा द्वेष करतात आणि त्यांची थट्टा करतात. आता सत्तेसाठी आपल्या संस्कृतीचा अपमान करणे ही नीचपणाची एक नवीन पातळी आहे.