Imtiaz Ali Jab We Met Sequel : बॉलिवूडमधील क्लासिक चित्रपटांच्या यादीत वरचे स्थान मिळवणारा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा 'जब वी मेट' (२००७) आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. करीना कपूरनं साकारलेली 'गीत' आणि शाहिद कपूर अभिनित 'आदित्य' या जोडीने पडद्यावर जो करिष्मा केला, तो विसरणे अशक्य आहे. आता जवळपास १८ वर्षांनंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. खुद्द इम्तियाज अली यांनी सिक्वेलमध्ये 'गीत' आणि 'आदित्य' कोण असू शकतात, याचा खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्तियाज अली यांना 'जब वी मेट'च्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "या वयात मला असे वाटते की शर्वरी वाघ आणि वेदांग रैना या भूमिकांसाठी अगदी योग्य आहेत. ते दोघेही तरुण आहेत आणि त्यांच्याकडे अशी जबरदस्त प्रतिभा आहे, जी त्यांना या पात्रांसाठी परिपूर्ण बनवते".
इम्तियाज यांचा पुढचा 'म्युझिकल' धमाकासिक्वेलच्या चर्चांसोबतच इम्तियाज अली यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणाही केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी, यात दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात पुन्हा एकदा ए. आर. रहमान यांचे संगीत असणार आहे. शर्वरी वाघ, वेदांग रैना आणि दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह देखील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग असणार आहेत.
Web Summary : Imtiaz Ali considers Sharvari Wagh and Vedang Raina ideal for 'Jab We Met' sequel, replacing Kareena and Shahid. Ali's next film stars Diljit Dosanjh, featuring A.R. Rahman's music, with Sharvari, Vedang, and Naseeruddin Shah also involved.
Web Summary : इम्तियाज अली ने 'जब वी मेट' के सीक्वल में करीना-शाहिद की जगह शर्वरी वाघ और वेदांग रैना को उपयुक्त माना। उनकी अगली फिल्म में दिलजीत दोसांझ और ए.आर. रहमान का संगीत होगा, जिसमें शर्वरी, वेदांग और नसीरुद्दीन शाह भी शामिल हैं।