Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ते ६० वर्षांचे झालेत, त्यांना बघण्यात तरुण पिढीला इंटरेस्ट नाही...", आमिर-सलमान-शाहरुखबाबत इमरान खान थेटच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:52 IST

आमिर खानचा भाचा आणि प्रसिद्ध अभिनेता इमरान खानने मात्र या तिघांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. वयानुसार भूमिका बदलतात. एका वयानंतर तुम्ही मुख्य भूमिका साकारू शकत नाही, असं मत त्याने मुलाखतीत मांडलं आहे. 

बॉलिवूडवर गेली कित्येक दशकं सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तीन खानचं राज्य आहे. ९०च्या दशकापासून सलमान-शाहरुख-आमिरची क्रेझ काही केल्या कमी झालेली नाही. ते बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार असून अजूनही प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहेत. आजही त्यांचे सिनेमे सुपरहिट होतात. पण, आमिर खानचा भाचा आणि प्रसिद्ध अभिनेता इमरान खानने मात्र या तिघांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. वयानुसार भूमिका बदलतात. एका वयानंतर तुम्ही मुख्य भूमिका साकारू शकत नाही, असं मत त्याने मुलाखतीत मांडलं आहे. 

इमरान खानने नुकतीच शोशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला बॉलिवूडच्या खान्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना इमरान खान म्हणाला, "वयानुसार भूमिकाही बदलत जातात. काही वर्ष तुम्ही मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारता. पण मग तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचता तेव्हा तुम्ही लीड रोल साकारण्यासाठी सक्षम नसता. तिन्ही खानचं वय आता ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ स्टारडम अनुभवलं आहे. याची कल्पना करणं किंवा त्यांची बरोबरी करणं मुश्किल आहे". 

"वय वाढल्यानंतर त्यांच्या भूमिकाही बदलल्या जातात. आणि तुमचं स्टारडमही बदलतं. कारण तुम्हाला मानणारा आणि तुमच्यासोबत मोठा होणारा एक प्रेक्षकवर्ग असतो. त्यानंतर एक नवी पिढी येते. ती पिढी तिच्या अनुभवानुसार आणि वयाप्रमाणे जे जवळचे वाटतात त्यांना जोडली जाते. जेव्हा पण आपण सिनेमे बघतो तेव्हा त्या कथेच्या हिरोमध्ये आपण स्वत:ला पाहत असतो. त्यामुळेच कदाचित युवा पिढीला ७० वर्षांच्या व्यक्तीला पाहण्यात इंटरेस्ट नसू शकतो", असंही तो पुढे म्हणाला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Imran Khan: Young generation not interested in 60-year-old Khans.

Web Summary : Imran Khan says the Khans (Salman, Shah Rukh, Aamir) have enjoyed stardom for over 30 years. Now aged 60+, roles change. The younger generation connects with heroes they relate to, possibly losing interest in older actors.
टॅग्स :इमरान खानशाहरुख खानसलमान खानआमिर खान