Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मनात यायचा रोज आत्महत्येचा विचार, केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 16:45 IST

माझ्या मनात रोज आत्महत्येचे विचार यायचा.

रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' आणि 'बादशाहो'' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना सध्या सिनेमातून गायब असली तरी तिने  पुन्हा एकदा सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.  एका मुलाखती दरम्यान इलियानाने सांगितले की, मी बॉडी डिस्मॉर्फिक डिसआॅर्डर आजाराने ग्रासली होती. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेली आहे. त्या काळात माझ्या मनात रोज आत्महत्येचे विचार यायचा.  मी कायम माझ्या शरिराबद्दल विचार करायची आणि स्वत:तील कमतरता बघून निराश व दु:खी व्हायची. मला कुणीच स्वीकारणार नाही, असे मला कायम वाटत राहायचे. मी स्वत:ला स्वीकारणे सुरु केले आणि अर्धी लढाई जिंकली.

नुकतीच इलियाना सक्सेस लाईफबाबत दिलेल्या स्टेटमेंटमुळे चर्चेत आली होती. इलियाना मी सेक्स एन्जॉय करते आणि त्याच्याकडे वर्कआऊट म्हणून पाहते. मला हे योग्य वाटत नाही.याशिवाय इलियानाने आपल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं.

इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्रयू निबोनसह रिलेशनशीपमध्ये होती. काही दिवसांनंतर त्यांच्यात खूप भांडण झाली. त्यानंतर त्यांनी वाद सोडवला नाही आणि ब्रेकअप केले. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर इलियाना आगामी सिनेमा पागलपंतीमध्ये झळकणार आहे. या सिनेमात इलियाना व्यतिरिक्त जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला आणि अरशद वारसी यांच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :इलियाना डीक्रूज