Join us  

‘भारत चांगल्या व्यक्तीच्या हातात’, मायकल डग्लस यांनी केले पीएम मोदींचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 6:22 PM

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मायकल डग्लस यांच्याकडून भारताचे तोंडभरुन कौतुक.

IFFI 2023: गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आहे. दिग्गज अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट निर्माते मायकल डग्लस (Michael Douglas) यांना यंदा 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात डग्लस यांनी भारतीय चित्रपट उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारे ओळख मिळाली आहे, त्यावर भाष्य केले. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले.

चित्रपट महोत्सवादरम्यान मायकल डग्लस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, मला असे वाटते की भारत खूप चांगल्या व्यक्तीच्या हातात आहे. हा देश आता पुढे जात आहे. ते पुढे म्हणतात की, या चित्रपट महोत्सवाचे सौंदर्य म्हणजे, यात 78 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ही भारतीय चित्रपट सृष्टीची ताकद आहे. याशिवाय त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचेही कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काय म्हणाले?प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांत चित्रपट निर्मितीसाठी अधिक पैसा गुंतवला आहे. हा एक अतिशय यशस्वी काळ आहे. चित्रपट लोकांना जात, धर्म, लिंग यांच्या पलीकडे एकत्र आणतात. विविध संस्कृतींना एकत्र आणण्यात चित्रपटांचा मोठा वाटा आहे.

मायकल डग्लस यांचे लोकप्रिय चित्रपटअभिनेते डग्लस यांनी फॉलिंग डाउन, द अमेरिकन प्रेसिडेंट, द घोस्ट अँड डार्कनेस, द गेम, द परफेक्ट मर्डर, अँट मॅन यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीइफ्फीगोवाहॉलिवूडबॉलिवूड