अलीकडे एका मुलाखतीत अली अब्बास या चित्रपटाबद्दल बोलला. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट टायगर व जोयाची कथा आहे आणि यात सलमान इतकीच कॅटरिनाची भूमिकाही महत्त्वाची आहे. कॅटरिनाने या चित्रपटाला होकार दिला नसता तर कदाचित हा चित्रपट बनलाच नसता, असे अली अब्बास यावेळी म्हणाला. खरे तर अली अब्बास म्हणतो, त्यात ब-यापैकी तथ्यही आहे. कारण, या चित्रपटासाठी कॅटने प्रचंड मेहनत घेतली आहे. कॅटरिना या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे.
‘एक था टायगर’मध्ये कॅट एक-दोन अॅक्शन सीन्स करताना दिसली होती. पण ‘टायगर जिंदा है’मध्ये ती सुद्धा सलमानप्रमाणेच फुल्ल टू अॅक्शनमध्ये दिसणार आहे. यासाठी तिने खास ट्रेनिंगही घेतले आहे. तिचे अॅक्शन सीन्स डिझाईन करण्यासाठी हॉलिवूडचा लोकप्रीय अॅक्शन अॅण्ड स्टंट डायरेक्टर टॉम स्टुथर्सची मदत घेण्यात आली आहे.
ALSO READ : सलमान खानने तोडली किसींग सीन न देण्याची शपथ? कॅटरिना कैफसोबत केले लिप लॉक??
अली अब्बासने दिलेल्या माहितीनुसार, कॅटरिनाने या चित्रपटात आयएसआय एजंटची भूमिका साकारली आहे. यासाठी कॅटने म्हणे काही रिअल लाईफ एजेंटची भेट घेतली. या चित्रपटात ती स्पेशल डान्स करताना दिसणार आहे. हा कॅटचा सगळ्यात धमाकेदार परफॉर्मन्स असल्याचे मानले जात आहे. तिचा डान्स पाहून चिकनी चमेली, शीला की जवानी, काला चश्मा सगळेच तुम्ही विसरून जाल. ‘टायगर जिंदा है’साठी कॅट व सलमानने झीरो डिग्री तापमान असलेल्या ठिकाणी शूटींग केले आहे.