तर ‘काबिल’ व ‘रईस’ यांनी केली असती ३०० कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 21:01 IST
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व बॉलिवूडचा सुपरहिरो म्हणून ओळख असलेला हृतिक रोशन यांचे आगामी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत ...
तर ‘काबिल’ व ‘रईस’ यांनी केली असती ३०० कोटींची कमाई
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व बॉलिवूडचा सुपरहिरो म्हणून ओळख असलेला हृतिक रोशन यांचे आगामी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत असल्याने यावरून सध्या चांगलेच वाद सुरू आहेत. शाहरुखचा रईस २६ जानेवारीच्या आसपास रिलीज होत असल्याने राकेश रोशन यांनी आपल्या चित्रपटाची तारीख बदलून २५ जानेवारी केली होती. मात्र शाहरुखने आपला चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर करून या आगीत तेल ओतण्याचेच काम केले. यावर राकेश रोशन यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा राकेश रोशन यांनी दोन्ही चित्रपटाबद्दलचे मत मांडले आहे. राकेश रोशन म्हणाले, ‘काबिल’ व ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर ३०० कोटींची कमाई करू शकले असते. मात्र बॉलिवूडमधील काही कलावंत एकमेकांवर आसूड उगविल्यासारखे काम करीत आहेत. ‘काबिल’ व ‘रईस’ हे दोन्ही दर्जेदार चित्रपट आहे. जर बॉक्स आॅफिसवर या दोन्ही चित्रपटांचा सामना एकाच दिवशी झाला नसता तर दोन्ही चित्रपटांनी आपल्या कमाईचा आकडा ३०० कोटीपर्यंत नेता आला असता, आता मात्र याची शक्यता धुसर वाटते. आता हे दोन्ही चित्रपट मिळून ३०० कोटी कमावतील का? असा प्रश्नही त्यानी केला. बॉलिवूडमधील कलावंत एकमेकांना टक्कर देण्याच्या प्रयत्नात बॉलिवूड कलाकार एकमेकांच्या व्यवसायावर गदा आणत आहे, असा टोलाही राकेश रोशन यांनी यावेळी लगावला. काबिलच्या प्रचारासंदर्भात बोलताना राकेश रोशन म्हणाले, ‘काबिल’च्या प्रचारासाठी आम्ही काही विशेष काही करणार नाही. काबिलचे प्रमोशन साधेपणे करणार आहोत. बॉलिवूडमधील कमाई करणाºया चित्रपटांचा उल्लेख करताना राकेश रोशन यांनी आमिर खान व सलमान खान यांच्या चित्रपटाचा दाखला दिला तर बॉक्स आॅफिस क्लॅश टाळण्यासाठी राकेश रोशन यांनी हॉलिवूडपटांचा उल्लेख केला.