Ibrahim Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानने (Ibrahim Ali Khan) 'नादानियॉं' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमामुळे इब्राहिम आणि खुशी कपूरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दरम्यान, या चित्रपटानंतर इब्राहिम अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इब्राहिम अली खानने अलीकडेच एका मुलाखतीत असे काही खुलासे केले आहेत ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. इब्राहिम अली खानने या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याची सध्या बी-टाऊनमध्ये खूप चर्चा होत आहे.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इब्राहिम अली खानने लहापणी त्याला झालेल्या गंभीर आजाराबद्दल खुलासा केला आहे. त्याबद्दल बोलताना इब्राहिम म्हणाला, "मी जन्माला आलो तेव्हा मला कावीळ झाली होती. कावीळ जास्त झाल्यामुळे माझ्या मेंदूला नुकसान झालं आणि त्यामुळे माझी ऐकण्याची क्षमता कमी झाली. ज्याचा माझ्या बोलण्यावर परिणाम झाला. मी अजूनही माझा आवाज आणि संवाद सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. यासाठी मी थेरिपिस्टची मदत घेतली." इब्राहिम अली खान केलेल्या या खुलासा ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आहे. इब्राहिम अली खान पहिल्यांदाच माध्यमांसमोर त्याच्या या आजाराबद्दल मोकळेपणाने बोलला आहे. त्यानंतर इब्राहिमने सांगितलं की, "जेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्याला परदेशात बोर्डिंग स्कुलसाठी पाठवलं. तेव्हा सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या."
इब्राहिम अली खान त्याच्या आगामी 'सरजमीन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणारा हा इब्राहिम अली खानचा पहिलाच चित्रपट आहे. इब्राहिम अली खानचा हा चित्रपट या वर्षी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.