Join us

"लग्नात यशस्वी झालो नाही, पण घटस्फोटात...", गौरी स्प्रेटसोबतच्या रिलेशनशीपदरम्यान असं का म्हणाला आमिर खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:10 IST

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 'सितारे जमीन पर' या चित्रपटात झळकणार आहे. आमिर सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par Movie) या चित्रपटात झळकणार आहे. आमिर सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. त्याच वेळी आमिर खान मुलाखतींमध्ये त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सतत बोलत असतो. अलिकडेच त्याने लग्न आणि घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली. आमिर खान म्हणतो की, तो लग्नात नाही तर घटस्फोटात यशस्वी झाला आहे.

आमिर खानने झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'ही आमच्या कुटुंबासाठीही एक गोष्ट आहे, ज्यावर आम्ही आनंदी नाही. आम्ही हे काम आनंदाने करत नाही आहोत. पण काही परिस्थिती अशा आल्या की आम्हाला असे वाटते की कदाचित आमचे नाते बदलले आहे. म्हणून माझा विचार असा आहे की एकतर मी जगासमोर खोटे बोलू शकतो आणि असे भासवू शकतो की किरण आणि माझ्यामध्ये खूप आनंद आहे आणि आम्ही विवाहित आहोत. मी लग्नात यशस्वी झालो नाही. पण मी घटस्फोटात यशस्वी झालो आहे.'

आमिरची दोन्ही लग्न ठरले अपयशी

आमिरचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले होते. या लग्नापासून त्याला जुनैद आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. हे लग्न सुमारे १५ वर्षे टिकले. त्यानंतर आमिरने घटस्फोट घेतला आणि किरण रावशी लग्न केले. आमिरला किरणपासून आझाद हा मुलगा आहे. पण किरण आणि आमिरचे लग्नही टिकले नाही. सुमारे १५ वर्षांनी त्यांनी हे लग्न मोडले. आता आमिर खान गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्याने गौरीला त्याच्या ६०व्या वाढदिवशी ओळख करून दिली.

वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, आमिर खान शेवटचा 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट चालला नाही. आता आमिर 'सितारे जमीन पर'  सिनेमात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :आमिर खान