Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझे करिअर संपुष्ठात आणण्याचा केला होता प्रयत्न', सिमी गरेवाल यांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 12:13 IST

सिमी गरेवाल यांनी घराणेशाहीवर निशाणा साधला आणि कंगनालाही पाठिंबा दर्शविला.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौतने बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कटकारस्थानांवर निशाणा साधायला सुरूवात केली. यात तिला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून पाठिंबा दर्शविला. तर काहींनी तिला तीव्र विरोध केला. बॉलिवूडमध्ये ज्या कलाकारांना नेपोटिझमचा सामना करावा लागला त्यांनी आपले अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले. त्यात आता बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी देखील सोशल मिडियावर आपला अनुभाव व्यक्त केला आहे आणि कंगनाने बॉलिवूडविरुद्ध उचललेल्या धाडसी पावलाचे कौतूक केले.सिमी गरेवाल यांनी म्हटले की, मला कंगनाचं खरंच कौतुक करावसं वाटतं. ती माझ्यापेक्षा फार धाडसी आहे. हे केवळ मलाच माहित आहे की एका दिग्गज व्यक्तीने माझं करिअर उद्धवस्त करण्याचा कसा प्रयत्न केला. मी गप्प राहिले, कारण माझ्यात तेवढी निडरता नव्हती, जितकी कंगनामध्ये आहे

त्यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले की, बाहेरून आलेल्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये काय काय सहन करावे लागते याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी समजू शकते सुशांत सिंह राजपूतने काय काय सहन केले असेल. या सर्व गोष्टी बदलण्याची आवश्यकता आहे.

सुशांतचा मृत्यू बॉलिवूड मध्ये काही बदल घडवेल. जेव्हा अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाला होता तेव्हा सुद्धा जागृति निर्माण झाली होती. तसेच काहीसे सुशांतच्या निधनानंतर होण्याची मला आशा आहे.

सिमी गरेवाल या लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘दो बदन’, ‘साथी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘सिद्धार्थ’, ‘कर्ज’ आणि ‘उडीकान’ या चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत.  

टॅग्स :सिमी गरेवालकंगना राणौतसुशांत सिंग रजपूत