Join us

आय अ‍ॅम इन हॅप्पी स्पेस - स्वरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 19:05 IST

गोड चेहरा आणि उत्तम अभिनय साकारणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सह-अभिनेत्रीच्या भूमिकेतून नावारूपास आली. ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘रांझणा’, ‘प्रेम रतन ...

गोड चेहरा आणि उत्तम अभिनय साकारणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सह-अभिनेत्रीच्या भूमिकेतून नावारूपास आली. ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘रांझणा’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांमध्ये तिने सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या. मात्र, ‘नील बटे सन्नाटा’ मध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्याने ती स्वत:ला खूप नशीबवान समजते. तसेच ‘अनारकली आरावली’ आणि ‘टिकली अ‍ॅण्ड लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटांतही तिच्या मुख्य भूमिका आहेत. त्यामुळे ती म्हणते, ‘आय अ‍ॅम इन हॅप्पी स्पेस’.२०१० मध्ये स्वरा भास्कर हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मुख्य भूमिकेत काम करण्याचे तिचे स्वप्न होते. पण, ते सुरूवातीच्या काळात पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, नंतर ‘नील बट्टे सन्नाटा’ नंतर तिला मुख्य भूमिका मिळू लागल्या. ती म्हणते,‘पहिले सहा वर्ष मी एक आऊटसाईडर होते. मी व्यावसायिक आणि स्वतंत्र प्रोजेक्टस साकारले. मी मुख्य भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. आता मला ती स्पेस, स्वातंत्र्य ‘नील बटे सन्नाटा’ मुळे अनुभवायला मिळत आहे. वेगवेगळया कथानकावर आधारित चित्रपट करायला मला आवडतात.’ स्वरा भास्कर या अभिनेत्रीच्या करिअरचा आलेख हा दिवसेंदिवस यशाच्या शिखरावर जाताना दिसतोय. आव्हानात्मक भूमिका करायला तिला आवडत असल्याने बॉलिवूडचं व्यापक जग तिला आगामी काळात प्रचंड संधी उपलब्ध करून देणार आहे.