Join us  

ले पंगा! वाढता विरोध पाहता कंगना रनौतची पलटी, म्हणाली - मी शेतकरी आणि पंजाबी लोकांसोबत....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 11:04 AM

अनेक लोकांकडून विरोध होताना दिसत असल्याने कंगनाने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ती शेतकऱ्यांसोबत आहे आणि याआधीही ती शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आणि समस्यांविरोधात बोलत आली आहे.

वादग्रस्त कृषी विेधेयकाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अपमानजनक शब्द वापरल्याने टिकेची धनी झालेली कंगना आता आपला आक्रामकपणा कमी करताना दिसत आहे. अनेक लोकांकडून विरोध होताना दिसत असल्याने कंगनाने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ती शेतकऱ्यांसोबत आहे आणि याआधीही ती शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आणि समस्यांविरोधात बोलत आली आहे.

कंगना रनौतने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेविरोधात अपशब्द वापरले होते आणि म्हणाली होती की, आंदोलन करणारे शेतकरी राजकारण करत आहेत. यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कंगनावर निशाणा साधला होता. एक दिवसाआधीच कंगना आणि दिलजीत दोसांझ यांच्या ट्विटरवर वाद पेटला होता. आता असं वाटतं की, तिला वाढता विरोध बघता तिने आपलं स्पष्टीकरण देण्यासाठी हे ट्विट केले आहेत.

कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, 'मी शेतकऱ्यांसोबत आहे. गेल्यावर्षी मी कृषिवाणीच्या एका प्रमोशनमध्ये भाग घेतला होता. आणि यासाठी डोनेशनही दिलं होतं. मी शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आणि त्यांच्या समस्या विरोधात नेहमीच आवाज उठवत आली आहे. मी त्यांच्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना केली आहे. जे अखेर या क्रांतिकारी बिलाच्या माध्यमातून होणार आहे'.

कंगनाने पुढील ट्विटमध्ये लिहिले की, 'हे विधेयक शेतकऱ्यांची जीवन आणखी चांगलं करण्यासाठी अनेक पद्धती बदलणार आहे. मी त्यांची अस्वस्थता आणि अफवांमुळे त्यांच्यावर पडलेल्या प्रभावांना समजू शकते. पण मला विश्वास आहे की, सरकार सर्वच शंकांचं समाधान करेल. ध्येर्य ठेवा. मी माझ्या शेतकऱ्यांसोबत आणि पंजाबच्या लोकांसोबत आहे. त्यांच्यासाठी माझ्या मनात खास जागा आहे'.

कंगनाने तिच्या तिसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, 'संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना विनंती आहे की, कोणत्याही कम्युनिस्ट-खालिस्तानी, तुकडे गॅंगला आपलं आंदोलन हायजॅक करू देऊ नका. मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आशा करते की, देशात पुन्हा एकदा शांतता आणि विश्वासाचं वातावरण तयार होईल. जय हिंद'. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडशेतकरीपंजाब