हृतिकचे सनीला यमी गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 16:32 IST
सोशल मीडियाला थँक्स म्हटलेच पाहिजे. कारण सोशल मीडियाने बॉलिवूड स्टार्समधील दरी भरून काढली आहे. आता बॉलिवूड स्टार्स एकमेकांसोबत फ्रेन्डलीचॅट करताना ...
हृतिकचे सनीला यमी गिफ्ट!
सोशल मीडियाला थँक्स म्हटलेच पाहिजे. कारण सोशल मीडियाने बॉलिवूड स्टार्समधील दरी भरून काढली आहे. आता बॉलिवूड स्टार्स एकमेकांसोबत फ्रेन्डलीचॅट करताना दिसतात..एकमेकांना विश करतात, एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतात..आता हृतिक रोशन आणि सनी लिओनी या दोघांनाच बघा ना! हृतिकने स्वत:च्या twitter हँडलवर यम्मी chocprotein cakeचा फोटो पोस्ट केला. हृतिकचा ट्रेनर मुस्तफा अहमद याच्या बर्थ डेचा हा केक पाहून सनीच्या तोंडाला लगेच पाणी सुटले. ‘मला हेवा वाटतोय. या फोटोची प्रींट काढावी आणि त्यातील केक खाऊन टाकावा, असे मला वाटतेय’, असे सनीने हृतिकला लिहिले. मग काय, सनीची हा केक खाण्याची इच्छा तर पूर्ण व्हायला हवीच ना! जेंटलमन हृतिकने लगेच सनीला रिप्लाय दिला. उद्या हा केक तुझ्या घरी पोहोचून जाईल,असे हृतिकने लिहिले आणि हे गिफ्ट सनीच्या घरी पोहोचले सुद्धा... व्वा हृतिक़..किती गोड ना!! }}}} }}}}