Join us

कुणासोबत गेला हृतिक सिक्रेट हॉलीडेवर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:04 IST

हृतिकसोबत आऊटिंगवर  जायला कुणाला नाही आवडणार? होय ना? हृतिक रोशनचे असंख्य चाहते त्याच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी धडपड करत असतात. ...

हृतिकसोबत आऊटिंगवर  जायला कुणाला नाही आवडणार? होय ना? हृतिक रोशनचे असंख्य चाहते त्याच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी धडपड करत असतात. एवढे असूनही कोण आहे तो भाग्यवान व्यक्ती ज्याला हृतिक सोबत हॉलीडेवर जाण्याची संधी मिळाली, असे तुम्हाला वाटत असेल. पण, सॉरी हृतिकने त्या व्यक्तीचे नाव सिक्रेट ठेवले आहे. ‘वेल प्लॅन हॉलीडे’ टूरवर तो एका स्पेशल व्यक्तीसोबत गेला एवढेच आत्तापर्यंत कळू शकले आहे. हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांनी डिसेंबर २०१३ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर कंगणा राणौतसोबत त्याचे प्रकरण चांगलेच गाजतेय. मग असं असताना तो कुणासोबत सिक्रेट हॉलीडेवर गेलाय हे देखील समजलं पाहिजे. पण, सुत्रांकडून कळतेय की, ‘हृतिक साधारणपणे भारताबाहेर त्याच्या टीमसह जात असतो. पण यावेळेस तो एकटाच गेला आहे. अज्ञात ठिकाणी त्याला एका अज्ञात व्यक्तीसोबत क्वालिटी टाईम घालवायचा आहे. हा सिक्रेट प्लॅन त्याने कित्येक दिवसांपासून बनवला होता. कुणीही ते ठिकाण शोधावे किंवा ती व्यक्ती कोण आहे याचा तपास  करू नये, असे त्याने सांगितले आहे. मध्यंतरी हृतिक रोशन आणि कंगणा राणौत यांच्यातील वाद एवढे टोकाला गेले की, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कायद्याच्या कचाट्यात आल्यानंतर मात्र, त्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आता या सर्व ताणतणावापासून थोडं निवांत होण्यासाठी तो एका पार्टनरसोबत हॉलीडे एन्जॉय करण्यासाठी गेला आहे. पण, ते फार काळ माध्यमांपासून लपून राहणार नाहीये. लवकरच कळेल.