हृतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केले बिकिनी फोटोशूट, सोशल मीडियावर खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 21:25 IST
अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत ‘काबिल’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री यामी गौतम हिने नुकतेच एक फोटोशूट केले असून, ...
हृतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केले बिकिनी फोटोशूट, सोशल मीडियावर खळबळ!
अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत ‘काबिल’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री यामी गौतम हिने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती अतिशय हॉट अंदाजात दिसत आहे. यामीने एका मॅगझीनच्या जानेवारीच्या अंकाकरिता हे बिकिनी फोटोशूट केले आहे. यामीने यातील काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, तिचे फोटो सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये यामीने ‘Hello 2018 ;)’ असे लिहिले, आणखी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘She dreams more often than she sleeps’ तर पुन्हा एक फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये ‘Not all who wander are lost ...’ असे लिहिले. दरम्यान, यामी गौतम आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूरसोबत बघावयास मिळणार आहे. यामीने २०१२ मध्ये ‘विकी डोनर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या व्यतिरिक्त तिने ‘अॅक्शन जॅक्सन, टोटल सफाया, बदलापूर, सनम रे, जुनूनियत, काबिल, सरकार-३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र अशातही यामी इंडस्ट्रीत स्ट्रगल करताना दिसत आहे.