Join us

पुन्हा एकदा हृतिक रोशन सबा आझाद डिनर डेटवर, हातात हात घालून जातानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 12:54 IST

आता अभिनेता हृतिक आणि गायिका सबा आझाद (Saba Azad) हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. हृतिकचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

हृतिक रोशन (Hrithik Roshan) बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय आणि हॅंडसम अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिकने २०१४ मध्ये सुझेन खानसोबत घटस्फोट घेतला. तेव्हापासून तो एकटा आहे तर सुझेन खान अर्सलान गोनीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. तेच आता अभिनेता हृतिक आणि गायिका सबा आझाद (Saba Azad) हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. हृतिकचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो मिस्ट्री गर्लच्या हातात हात घेऊन दिसला. पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

या व्हिडीओत बघू शकता की, हृतिक रोशन आणि सबा आझाद डिनरनंतर एका कॅफेतून बाहेर येत आहेत. कॅफेतून निघत असताना हृतिक रोशनने सबाचा हात धरला आणि एकत्रच एका गाडीत बसले. यादरम्यान हृतिक सबाची फारच काळजी घेताना दिसला. हृतिक रोशन आणि सबाच्या या व्हिडीओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे.

याआधीही काही दिवसांपूर्वी हृतिक सोशन आणि सबा आझाद डिनर डेटला गेलेले दिसले होते. तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या मिस्ट्री गर्लबाबत चर्चा रंगली होती. नंतर ती सबा आझाद असल्याचं समजलं. अशात दोघांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरू झाली.  एका यूजर्सने लिहिलं की, 'दोघं लग्न कधी करणार आहात?'. सबा आझाद ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. तसेच ती एक गायिकाही आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसोशल व्हायरल