बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने पुन्हा एकदा बॉडी बनवण्यासाठी मेहनत घेत आहे. पिळदार शरिरयष्टी बनवण्यासाठी तो ट्रेनरच्या उपस्थितीत वर्कआऊट करतो आहे. बऱ्याच कालावधीनंतर हृतिक जिममध्ये घाम गाळतो आहे आणि त्याला वजन घटवायचे असल्याचे समजते आहे.
नुकतेच हृतिक रोशनने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतो आहे.
या व्हिडिओत त्याच्यासोबत ट्रेनर असून तो त्याला मार्गदर्शन करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ शेअर करून हृतिकने लिहिले की, कधी विचार केला नव्हता की परतीचा रस्ता कठीण असेल. पण आता सातत्याने.
पुढे त्याने म्हटले की, दुखल्याशिवाय काहीच साध्य होत नाही. स्वतःला स्वतःच फिट बनविले पाहिजे. त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. स्वतःसाठी काम करा आणि सर्व मर्यादा पार करा.
हृतिक रोशनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर लवकरच तो सुपर ३०मध्ये झळकणार आहे.
या चित्रपटात हृतिक बिहारच्या एका शिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो समोर आले होते. त्यात त्याचा या चित्रपटातील लूक पहायला मिळाला होता.
याशिवाय तो टायगर श्रॉफसोबत एका डान्स फिल्ममध्ये दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करू शकतात.