बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा नवा चित्रपट 'ओ रोमियो' (O Romeo) पाहिला असून, तो या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. विशाल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे हृतिकने सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले आहे.
हृतिक रोशनची सोशल मीडिया पोस्ट
हृतिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला आहे. हृतिक लिहितो, "ओ रोमियोची अनोखी धाटणी (Quirkiness) तुम्हाला खिळवून ठेवते. मला हा चित्रपट पाहताना खूप मजा आली." पुढे त्याने शाहिद कपूरचा उल्लेख करत म्हटले, "शाहिद, तू अशा प्रकारच्या चित्रपटासाठी सर्वोत्तम आहेस. तू अप्रतिम काम केलं आहेस!"
हृतिक रोशन स्वतः एक उत्तम ॲक्शन स्टार आहे, त्यामुळे त्याने चित्रपटातील ॲक्शन दृश्यांची विशेष दखल घेतली. "सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहा. विशेषतः तो गोल धावण्याचा ॲक्शन सीन अत्यंत जबरदस्त होता," असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
विशाल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'ओ रोमियो' हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी, नाना पाटेकर आणि अविनाश तिवारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असला, तरी प्रेक्षकांकडून आणि सिनेइंडस्ट्रीतून चित्रपटाचे कौतुक होत आहे. 'ओ रोमियो'ने पहिल्या सात दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे ४७.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Web Summary : Hrithik Roshan loved 'O Romeo,' praising Shahid Kapoor's performance and the film's quirkiness. He urged fans to watch the action-thriller in theaters, especially highlighting a running scene. The film stars Tripti Dimri and has earned ₹47.15 crore in India.
Web Summary : ऋतिक रोशन को 'ओ रोमियो' पसंद आई, उन्होंने शाहिद कपूर के प्रदर्शन और फिल्म की विचित्रता की प्रशंसा की। उन्होंने प्रशंसकों से सिनेमाघरों में एक्शन-थ्रिलर देखने का आग्रह किया, खासकर एक रनिंग सीन को उजागर किया। फिल्म में तृप्ति डिमरी हैं और इसने भारत में ₹47.15 करोड़ कमाए हैं।