Hrithik Roshan : बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' अर्थात हृतिक रोशन त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी ओळखला जातो. वयाच्या ५२ व्या वर्षीही खूप फिट आणि निरोगी आहे. त्याची शिस्तबद्ध जीवनशैली आणि निरोगी डाएट प्लान त्याच्या फिटनेसमागे दडले आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर आपल्या वर्कआउटनंतरच्या जेवणाचा एक फोटो शेअर केला आहे. हे जेवण आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे हृतिकने म्हटले आहे.
हृतिकने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ज्वारीची भाकरी, भेंडी, बीट, वांगी, पापडी आणि दुधी यांसारख्या भाज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रथिनांसाठी त्याने यात अंड्याचा पांढरा भाग आणि मसूर यांचाही समावेश केला आहे. या जेवणाला त्याने 'इंडियन मिक्स' असे नाव दिले असून, "यापेक्षा उत्तम काय असू शकते?" असं त्याने लिहलं. चाहत्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने विचारले, "तुम्ही खरोखर हे सगळं एकत्र खाता का?". तर दुसऱ्याने हृतिकच्या शिस्तीचे कौतुक केले आहे.
निर्माता म्हणून ओटीटीवर पदार्पणअभिनयानंतर हृतिक आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकत आहे. त्याची 'स्टॉर्म' नावाची एक थ्रिलर वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल. 'तब्बर' फेम अजितपाल सिंग या मालिकेचे दिग्दर्शन करत असून मुंबईत याचे चित्रीकरणही सुरू झाले आहे.
'क्रिश ४' बद्दल मोठी अपडेटहृतिकच्या चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे बहुप्रतीक्षित 'क्रिश ४'. या चित्रपटाद्वारे हृतिक दिग्दर्शनात पदार्पण करण्याची शक्यता आहे. यशराज फिल्म्स आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटात हृतिक पुन्हा एकदा सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार असून त्याचे स्केल जागतिक दर्जाचे असणार आहे.
Web Summary : Hrithik Roshan's healthy diet, featuring 'Indian Mix' with vegetables and lentils, surprised fans. He's also producing a web series and may direct 'Krrish 4,' expected late this year or early 2027.
Web Summary : ऋतिक रोशन के स्वस्थ आहार, जिसमें सब्जियां और दालें शामिल हैं, ने प्रशंसकों को चौंका दिया। वह एक वेब सीरीज का निर्माण कर रहे हैं और 'कृष 4' का निर्देशन भी कर सकते हैं, जिसकी उम्मीद इस साल के अंत या 2027 की शुरुआत में है।